Advertisement
नागपूर : शहरात रविवारी मध्यरात्री भरधाव ऑडी कारने पाच गाड्यांना धडक दिली. ही गाडी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकते बावनकुळे यांची होती. यावरून विरोधकांनी बावनकुळे यांच्यासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धारेवर धरले. यावर आता स्वतः फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
संकेत बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने अनेक वाहनांना धडक दिली, त्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य करणे योग्य नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे सांगितले.
या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत आणि एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तथापि, विरोधी पक्ष ज्या पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य करीत आहेत ते योग्य नाही, असे फडणवीस म्हणाले.