कंत्राटी कामगारांना 20 टक्के वेतनवाढ
नागपूर: भारतीय जनता कामगार महासंघ कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्र या संघटनेतर्फे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रविवारी नुकताच सत्कार करण्यात आला.
परिमंडळ 1 आणि जानेवारी महिन्यापासून 20 टक्के वेतनवाढ करून दिल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.शाल, स्मृतीचिन्ह व श्रीफळ असे या सत्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमाला महादुला नगर पंचायतचे अध्यक्ष राजेश रंगारी, महादुला शहर अध्यक्ष अजय वाणी, पाणीपुरवठा सभापती पंकज ढोणे, माजी ग्रा.पंचायत सदस्य प्रीतम लोहासारवा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आकाश उके, कामगार महासंघाचे अध्यक्ष प्रशांत अडकने, उपाध्यक्ष राहुल नागदेवे, अंजित गेडाम, किशोर सोनवणे, राजेश हरिहर, यश भालेगाव, प्रतीक रंगारी, मंगेश मोरे, मुकेश वाघुळकर, पराग पाटील, शैलेश जामगडे, नंदू रेवतकर, गणेश कुरडकर, प्रवीण घोडेस्वार, राज जामगडे, ललित सेवतकर, सुरेश वानखेडे, नीलेश वानखेडे, विक्रांत वाणी, संजू पवार, आणि मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते.
परिमंडळ 1 मधील कुशल कामगारांना 12630 रुपये मूळ वेतन देण्यात येणार आहे. अर्धकुशल कामगारांना 11470 रुपये, तर अकुशल कामगारांना 10350 रुपये मूळ वेतन मंजूर झाले आहे. गेल्या 1 सप्टेंबरपासून ही वाढ कामगारांना देण्यात येणार आहे. मूळ वेतनाच्या 20टक्के पूरक भत्ताही लागू करण्यात आला आहे. वीज केंद्राच्या कंपाऊंड वॉलच्या आत काम करणार्या कामगारांना हे लागू करण्यात आले आहे.