“तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे ना रहे” या उक्तीप्रमाणे मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलीदान दिले असे क्रांतीवीर शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या ८९ व्या बलीदान दिना निमित्त उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे व गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार यांनी सेंट्रल एव्हेन्यू रोड स्थित चंद्रशेखर आझाद यांच्या पूर्णाकृती पुतळयाला नगरीच्या वतीने पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी नगरसेविका श्रध्दा पाठक, नगरसेवक राजेश घोडपागे, माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, माजी सत्तापक्ष नेता प्रमोद पेंडके, भाजपाचे किशोर पलांदूरकर, विलास त्रिवेदी, दशरथ मस्के, श्रीकांत आगलावे, सुबोध आचार्य, श्याम चांदेकर, गणेश भांडारकर, आशिष भुते, ऋषभ सनेश्वर, प्रशांत मानेकर, भूषण देशपांडे, चंद्रशेखर आझाद दलाचे रवींद्र ठाकूर, नितीन ठाकूर, बाबा ठाकूर, शकुंतला ठाकूर, हिरालाल शर्मा, विनोद इंगोले, कौशल काका, नथ्थूजी कामठे आदी उपस्थित होते.