Published On : Sat, May 5th, 2018

भूमी’धारी’ ऐवजी भूमी’स्वामी’ एवढा एकच बदल काँग्रेस करू शकली नाही : ऊर्जामंत्री बावनकुळे

Advertisement


भंडारा: जिल्हयातील हजारो शेतकरी भूमीस्वामी असताना ते भूमीधारीच म्हणवले जात होते. पण 15 वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने शेतकèयांनी भूमीस्वामी करून त्यांना मालकी हक्क त्यांना दिला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मात्र हा निर्णय घेऊन विदर्भातील लाखो शेतकèयांच्या वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करून या शेतकèयांना भूमिस्वामी केले, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

तुमसर येथे संताजी मंगल कार्यालयात तुमसर मोहाडी विधानसभेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आ. चरण वाघमारे, भंडारा जिल्हा भाजपा अध्यक्ष तारीश कुरेशी, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. युवराज जमईवार, माजी खा. शिशुपाल पटले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निशिकांत इलमे, बाबुजी ठवकर, तुमसर शहर भाजपाध्यक्ष विजय जयस्वाल, माधुरी कुलकर्णी, विशाखा बांडेबुचे, पल्लवी कटरे, डॉ. प्रकाश मालगावे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले- अन्य पक्ष घराणेशाहीच्या आधारे चालतात पण भाजपा हा घराणेशाहीवर चालणारा पक्ष नाही. डॉ. आंबेडकरांच्या घटनेने घराणेशाही संपवली. सामान्य नागरिकाला मताचा अधिकार देऊन देशाचा पंतप्रधान निवडण्याचे अधिकार दिले. केवळ साडे तीन वर्षात पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यास भाग पाडणाèया माजी खासदाराविरोधात जनतेत तीव्र आक्रोश आहे. कारण एकही काम या मतदारासंघात झाले नाही. प्रत्येक खासदाराला पंतप्रधानांनी आपल्या मतदारसंघात किती योजना पोहाचवल्या याची माहिती विचारली. पण या मतदारसंघाचे माजी खासदार मात्र चूप बसून होते. काही केलेच नाही, तर सांगणार काय? याकडे ऊर्जामंत्र्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजनांवर उपस्थितांचे लक्ष केंद्रित करताना बावनकुळे यांनी येत्या 8 महिन्यात केंद्राच्या अनेक योजना या मतदारसंघात आणल्या जातील असे सांगितले. शेतकèयांना दिवसा वीज देणार, एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर, नळयोजनांना सौर पंप अशा अनेक योजनांचा आढावा घेत माहिती दिली. येत्या 9 मे रोजी भाजपाचा उमेदवार उमेदवारी अर्ज भंडारा येथे सादर करणार आहे, त्या दिवशी कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

आ. चरण वाघमारे
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता ज्या माजी खासदाराला मते मिळवून देऊन निवडून आणले, त्याच माजी खासदाराला आता त्याची जागाही दाखविण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली असल्याचे सांगून आ. चरण वाघमारे म्हणाले- या राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून भारनियमन नाही. प्रधानमंत्री आवास योजनेत 66 हजार लोकांना लाभ मिळणार आहे. त्याची कामे सुरु झाली आहेत. 15 हजार लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. आपल्या सरकारने लाखावर शेतकèयांना कर्जमुक्त केले, भूमिधारी शेतकèयांना भूमिस्वामी केले. यापुढेही शासनाच्या योजनांचा लाभ लोकांना मिळणारच आहे. फक्त 28 मे रोजी कमळाची बटन दाबून भाजपाला मजबूत करण्याचे आवाहन आ. वाघमारे यांनी केले.

याचप्रसंगी डॉ. प्रदीप पडोळे, माजी खा. शिशुपाल पटले यांचेही भाषण झाले. त्यांनीही कार्यकर्त्यांनी 9 मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो महिला आणि तरुण कार्यकर्त्यांनी याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला.

Advertisement
Advertisement