कामठी:-महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने 1 सप्तेंबर 2017 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून नोव्हेंबर ऑक्टोबर-महिन्यात 5 वर्षाचा कार्यकाळ संपणाऱ्या अश्या 27 ग्रामपंचयतीची सार्वत्रिक निवडणूक 14 ऑक्टोबर 2017ला होणार असल्याचे जाहिर झाले आहे
तर 14 ऑक्टोबर हा धम्मचक्र प्रवर्तन दिन असून बौद्ध बंधवांच्या वतीने हा दिवस मोठ्या उत्साहने साजरा करण्यात येतो तर या दिवशी धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रम असल्याने गावात शांतता भांग होण्याची दाट शक्यता आहे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 14 ऑक्टोबर 2017 ही निश्चित केलेली
निवडनुकीची तारीख रद्द करित पुढचि तारीख निश्चित करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कुंदाताई आमधरे यानि केली असुन यसोबतच भारतीय बौद्ध महासभा चे हंसराज ढोके,बहुजन समाज पर्टीचे आनिल कुरील, कांग्रेस च्या अवंतिका लेकुरवाड़े, भाजप चे उज्वल रायबोले, उन्मेष महल्ले, तसेच विविध राजकीय ,सामाजिक संघटना तसेच जागरूक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.