नागपूर : मोदी सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मंगळवारी (२३ जुलै २०२४) अर्थसंकल्प सादर केला.अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सोन्याच्या दरात बदल पाहायला मिळाला आहे.सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे.
तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे.
अर्थसंकल्पाने सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बेसिक कस्टम ड्युटी १० टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणली आहे.
सोन्याचा भाव सध्या ७३००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास आहे, जो २०२४च्या सुरुवातीला ६३,८७० रुपये प्रति १० ग्रॅम होता. याचाच अर्थ यंदा सोन्याचे भाव १५ टक्क्यांनी वाढले आहेत. आता कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे, किंमतीत घट होण्याची अपेक्षा आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,७६० रुपये इतका आहे.