नागपूर:आगामी नवरात्रोत्सवादरम्यान सुरळीत वाहतूक आणि सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस उपायुक्त (डीसीपी) अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली नागपूर वाहतूक पोलिसांनी महादुला टी-पॉइंटजवळील वर्दळीच्या कोराडी रोडवर वाहतूक निर्बंध जारी केले आहेत. इंदोरा ट्रॅफिक झोनमध्ये 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत निर्बंध लागू असतील.
वाहतूक परिमडंळ इंदोरा हद्दीत नागपूर ते बैतुलकडे जाणारा कोराडी रोड हा मुख्य राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 41 असून या रोडवर वाहतूकीची जास्त वर्दळ असते. महादुला टी पॉईंट परीसरात मोठ्या प्रमाणावर मजदूर वर्गातील लोकांची रहदारी असते तसेच सदर परीसरात स्थानिक बाजारपेठ आहे. पो. ठाणे कोराडी हद्दीत असलेल्या श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानामुळे परीसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते त्यामुळे महादुला टी पाईंट परीसरात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण होते परिणामी भविष्यात यामुळे गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच बाजापेठेत वाहने रस्त्यावर उभी करण्याचे प्रकार घडत असतात. इतकेच नाही तर कोराडी रोड महादुला मार्गावर लोक मोठ-मोठे बॅनर लावतात ज्यामुळे वाहन चालकाला समोरून येणारे वाहन दिसून येत नाही. त्यामुळेअपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे गांभीर्य लक्षात घेता परिसरात कोणतेही बॅनर लागणार नाहीत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून महादुला टी पॉईंटच्या आजूबाजूचा 50 मीटर परीसर हा वाहनाचे पार्कीग करीता प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करणे आवश्यक आहे.त्यामुळे वाहतूक विभागाने काही नियमांमध्ये बदल केले आहे.
‘या’ ठिकाणी वाहतूक निर्बंध-
-महादुला टी पॉईंटच्या आजूबाजूचा 50 मीटर परीसर व कोराडी रोड महादुला सिर्व्हस रोड वाहनाच्या पार्किंगसाठी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.
– संबधीत विभागाची परवानगी घेतल्याशिवाय महादुला टी पॉईंटच्या आजुबाजुचा 50 मीटर परिसर व कोराडी रोड महादुला सिर्व्हस रोड येथे कोणतेही बॅनर लागणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.