नागपूर: मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०४व्या जयंती निमित्त ३ एप्रिल २०२५ रोजी शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या शोभायात्रेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असून, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागपूर पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन आणि निर्बंध लागू केले आहेत.
वाहतूक मार्ग आणि बदल:
शोभायात्रा मार्ग टिमकी तिनखंबा चौक, गोळीबार चौक, गांजाखेत चौक, तिननल चौक, शहिद चौक, टांगा स्टॅन्ड चौक, गांधी पुतळा चौक, दारोडकर चौक, वर्धमान नगर चौक आणि वर्धमान नगर पॉवर हाऊस चौक येथून मानव मंदिर सांस्कृतिक भवनपर्यंत जाणार आहे.
‘या’ मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल-
१) बाबा जुमदेव यांची रैली टिमकी तिन खंबाचौक येथुन निघते वेळी त्या बाजुने मोमिनपुरा चौका कडुन येणारी वाहतुक नालसाहाब चौकाकडे वळविणे आवश्यक आहे.
२) कमाल टॉकीज चौक पाचपावली उड्डाण पुल येथुन गोळीबार चौक कडे येणारी वाहतुक, कमाल टॉकीज चौक येथुन लष्करीबाग नवा नकाशा व वैशाली नगर कडे वळविणे आवश्यक आहे.
३) गोळीबार चौक कडुन गांजाखेत कडे येणारी वाहतुक भारतमाता चौक व मोमीनपुरा चौका कडे वळविणे आवश्यक आहे.
४) भारत माता चौक कडुन तिन नल चौका कडे येणारी वाहतुक मस्कासाथ चौक व गोळीबार चौक कडे वळविणे आवश्यक आहे.
५) नंगापुतळा चौक कडुन तिन नल चौकाकडे जाणारी वाहतुक इतवारी सीटी पोस्ट ऑफिसकडे व गांधीबाग काली माता
मंदीर कडे वळविणे आवश्यक आहे.
६) मरकासाथ चौक कडुन शहीद चौक कडे येणारी वाहतुक, मस्कासाथ चौक येथुन मारवाडी चौक व भारत माता चौक कडे वळविणे आवश्यक आहे.
७) गांधी पुतळा चौक येथुन टांगा स्टॅन्ड घडी चौक कडुन शहीद चौक कडे जाणारी वाहतुक व निकालस मंदिर व इतवारी नंगापुतळा चौक कडे वळविणे आवश्यक आहे.
८) नेहरू पुतळा कडून जुना भंडारा रोडकडे येणारी वाहतुक मारवाडी चौक व गोळीबार चौक कडे वळविणे आवश्यक आहे.
०९) आजमशाह चौक येथुन जुना मोटर स्टॅण्ड चौक येथे जाणारी वाहतुक बंद करने आवश्यक आहे.
१०) गांधीपुतळा कडे येणारी वाहतुक सोना रेस्टारेंन्ट चौक कडुन अग्रसेन चौक व गांधीबाग कडे वळविणे आवश्यक आहे.
११) दारोडकर वौक येथे येणारी वाहतुक लकडापुल येथुन बडकस चौक आणि निकालस मंदिर रोडनी व दारोडकर चौक कडे येणारी वाहतुक मासुरकर चौक कडे वळविणे आवश्यक आहे.
१२) जुना मोटर स्टैण्ड येथुन आजमशाह चौक कडे येणारी वाहतुक सुनिल हॉटेल व शहीद चौक येथे वळविणे आवश्यक आहे.
१३) टेलीफोन एक्सचेंज चौक येथे गंगाबाई घाट कडुन येणारी वाहतुक आजमशाह चौकाकडे वर्धमान नगर येथुन येणारी वाहतुक गंगाबाई घाट कडे वळविणे आवश्यक आहे.
१४) जुना मोटर स्टैण्ड येथुन सुभाष पुतळा सुनिल हॉटेल कडे जाणारी वाहतुक आजमशाह चौकाकडे व मारवाडी चौक येथे वळविणे आवश्यक आहे.
१५) आंबेडकर चौक कडुन सुदर्शन चौक कडे येणारी वाहतुक सारडा चौक व महाविर चौक कडे वळविणे आवश्यक आहे.
१६) सोनबानगर रेल्वे कासिंग येथुन वर्धमान नगर पावर हॉउस चौक कडे येणारी वाहतूक सोनबानगर रेल्वे कासिंग येथुन सुखसागर बिल्डींग जवळून वैष्णोदेवी चौका कडे वळविणे आवश्यक आहे.
१७) वर्धमान नगर पावर हाउस कडे डिप्टी सिग्नल रेल्वे कासिंग येथुन येणारी वाहतुक डाव्या बाजुस रस्ता बंद करून उजवे बाजुचे रोडनी वळविणे आवश्यक आहे.
१८) चिखली चौक ते डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसींग मागे वर्धमान नगर पावर हाऊस चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहन हि चिखली चौकाततुन एच. बी. टाऊन गोमती हॉटेल चौक व ईटाभट्टी चौकाकडे वळविणत येत आहे.
१९) एच. बी. टाऊन गोमती कॉटेल चौक ते सोनबा नगर रेल्वे क्रॉसींग मार्गे वर्धमान नगर पावर हाऊस चौकाकडे येणारी जड वाहतूक ही प्रजापती चौकाकडे वळविण्यात येत आहे.
२०) गंगाबाई घाट चौक मार्गे टेलीफोन एक्सचेंज चौकाकडे येणारी वाहतूक ही वैष्णोदेवी चौक व गंगाबाई घाट कहे चळविण्यात येत आहे.
२१) वर्धमान नगर (महाविर चौक) ते पावर हाऊस चौकाकडे जाणारी वाहतूक ही वैष्णोदेवी चौकाकडे वळविण्यात येत आहे.
२२) पारडी पुलावरून येणारी वाहतुक चिखली चौकाकडे वळविणे आवश्यक आहे, तसेच कळमणा कडुन वर्धमान पावर हाउसकडे येणारी वाहतूक पारडी चौकाकडे वळविणे आवश्यक आहे.
२३) हिवरी नगर चौकाकडून वर्धमान नगर चौका कडे येणारी वाहतूक हिवरी नगर चौका कडुन भीम चौका कडे वळवतील,
२४) हिवरी नगर चौका कडुन आंबेडकर चौका कडे येणारी वाहतूक भीम चौका कडे वळवतील.
२५) हिवरी नगर चौका कडुन छापरू नगर चौका कडे येणारी वाहतूक माता मंदीर चौका कडे वळवतील.
२६) सुभाष नगर चौका कडुन वर्धमान नगर पॉवर हाउस कडे येणारी वाहतूक जुना मोटार स्टॅन्ड चौका कडे वळवतील.
२७) शास्त्री नगर कडून आंबेडकर चौका कडे येणारी वाहतुक हि हिवरी नगर कडे वळविण्यात येईल.
image.png