नागपूर : राज्याच्या उपराजधानीत लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. 7 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होईल. चितार ओळी मध्ये गणपती मूर्ती तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालते. यापार्श्वभूमीवर भावसार ते बडकस चौकापर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त शशिकांत सातव यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली.
भावसार चौक ते बडकस चौक दरम्यान वाहतुकीसाठी जवळचा रस्ता म्हणून वाहन चालक चित्तार ओळीचा वापर करतात. त्यामूळे बडकस चौक ते भावसार चौक चितार ओळ मार्गे फार मोठ्या प्रमाणात रहदारी चालते. वाहतूक सुरळीत राहावी व नागरीकांना गैरसोय किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक नियमन करण्याचे दृष्टीने नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत नागपूर शहरात वाहतूकीचे नियमनाकरिता खालील बदल करण्यात आले आहे.
वाहतूक बदल –
अ) बडकस चौकाकडून चितार ओळी मार्गे भावसार चौकाकडे जाणारी एकेरी वाहतूक सूरू ठेवून भावसार चौक ते चितार ओळी मार्गे बडकस चौक अशी वाहतूक बंद करण्यांत आली आहे.
ब) मार्ग वरील कालावधीसाठी एक दिशा मार्ग (वन-वे) म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. भावसार चौकाकडून चितार ओळी मार्गे जाणारी वाहतुक भावसार चौक ते गांधी पुतळा चौक मार्गे
बडकस चौकाकडे वळविण्यांत आली आहे.
क) बडकस चौक ते शहिद चौक व शहिद चौक ते बडकस चौकाकडे जाणारी वाहतूक गांधीपुतळा चौक येथुन बंद करण्यात येत आहे. तसेच बडकस चौक कडून येणारी वाहतूक चिटणीस पार्क मार्गे चोकाकडे व शहिद चौकाकडुन येणारी वाहतूक दारोडकर चौकाकडे वळविण्यात येत आहे.
ड) वेळप्रसंगी आवश्यक परिस्थिती नुसार वेळेवर योग्य मार्गाने वाहतूक वळविण्यांचे अधिकार कर्तव्यावरील वाहतुक अमंलदार यांना प्रदान करण्यांत आले आहेत.