नागपूर : अयोध्येतील राम जन्मभूमीवर २२ जानेवारीला होणाऱ्या भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण व रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील वातावरण भगवे झाले आहे. यापार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, विविध प्रतिष्ठाने, संस्था संघटना सर्वांमध्येच श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे.
विशुद्ध विद्यालय द्वारा संचालित विवेकानंद विद्यालयातील ५०० विद्यार्थ्यांनी ‘श्रीराम’ अक्षरे साकारून शाळाही राममय केली. तर दुसरीकडे नागपुरातील शाळेत शिक्षिकेचा विद्यार्थांसह राम भजनावर डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
यादरम्यान विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’, ‘सियावर रामचंद्र की जय’ व ‘पवनसुत हनुमान की जय’ च्या घोषणांनी शाळा परिसर दणाणून टाकला. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या भव्य सोहळ्याची प्रतीक्षा जगभरातील राम भक्त करत आहेत. तसेच नागपुरातही या ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले.