नागपूर: महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. यासोबत नागपुरातील विविध शिवमंदिरात महादेवचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटे पासूनच रांगा लावल्या होत्या.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांतून हर हर महादेव, बम बम भोले चा गजर सुरु असल्याने वातावरण भक्तीमय झाले आहे. महाशिवरात्री निम्मित शहरातील सर्व मंदिराना फुलांनी सजविण्यात आले आहे. तसेच ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भगवान महादेव आणि पर्वती मातेच्या पूजा अर्चना आणि अभिषेकला सुरुवात झाली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास ते सोडला जातो. महाशिवरात्री हा एक हिंदू सणातील अतिशय महत्त्वाचा सण आहे. जो देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हिंदू धर्मातील त्रिदेवांपैकी एक असलेल्या भगवान शिव शंकराची आराधना या महाशिवरात्रीला केली जाते. या दिवशी देशभरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम व उत्सव असतात.
महाशिवरात्री, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ “शिवांची महान रात्र” असा होतो. हा सण हिंदू कॅलेंडरातील फाल्गुण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या रात्री येतो. 2025 मध्ये, महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला साजरी करण्यात येत आहे.