Published On : Mon, Nov 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

Checking of bags at Vani Helipad; Uddhav Thackeray got angry, attacked the Grand Alliance

Advertisement

वणी- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभांना सुरुवात केली. ठाकरे यांची आज वणी येथे सभा होत आहे.या सभेसाठी ठाकरे हेलिकॉप्टरने गेले आहेत, यावेळी हेलिपॉडवर उतरताच ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांना तपासल्याचे समोर आले आहे.मात्र अधिकाऱ्यांच्या या कृत्यावर उद्धव ठाकरे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारावरून त्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला.
बॅग तपासायची आहे, मी म्हणालो तपासा. त्यांचा व्हिडीओ काढला आहे. एक लक्षात घ्या तुम्हाला कुठेही चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवले तर त्यांचीही चौकशी करा. ते कुठे नोकरीला आहेत हे तपासा. जसे ते आपले खिसे तपासतात तसे त्यांचेही तुम्ही खिसे तपासा कारण हा आपला अधिकार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

यानंतर मी त्या अधिकाऱ्यांना म्हणालो मोदी आणि शाहांची बॅग तपासली का? एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासायला हवी की नको? असा प्रश्न ठाकरेंनी त्या अधिकाऱ्यांना केल्याचे सांगितले.

Today’s Rate
Thursday 21 Nov. 2024
Gold 24 KT 76,700 /-
Gold 22 KT 71,300 /-
Silver / Kg 91,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्र कधीही गद्दारांना क्षमा करत नाही. त्यांना हेच सांगायचे आहे की, त्यांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, पण त्यांनी रायगडावरचे टकमक टोक बघितले नाही. ते त्यांना २३ तारखेला दाखवायचे आहे. रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी २३ तारखेचे गुवाहाटीचे तिकीट काढून द्यावे, कारण एकाला तिकडे पाठवायचे आहे. मग त्यांनी तिथे झाडे, डोंगर मोजत बसावे, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापू यांचे नाव न घेता लगावला.

दरम्यान, महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहेत. शेतकरी हमीभाव मागतो आहे. मात्र, भाजपा त्यांना काश्मीरमधील ३७० रद्द केल्याचे आणि राम मंदिर बांधल्याचे सांगत आहे. राज्यातील मुलभूत प्रश्नांवर भाजपा बोलत नाही. महायुतीकडून मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली

Advertisement