कन्हान: शिवभक्त युवा प्रतिष्ठान कांद्री व्दारे छात्रवीर राजे संभाजी महाराज यांची ३६१ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली. कांद्री वार्ड क्र.२ दंत मंदीर परिसरात शिवभक्त युवा प्रतिष्ठान कांद्रीचे संयोजक सागर कनोजे, गणेश ठाकरे, विक्की नांदुरकर या युवकांच्या प्रमुख उपस्थितीत छात्रवीर राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवपुत्र संभाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. या प्रसंगी लोकेश आंबाडकर यांनी छात्रविर संभाजी महाराज यांच्या जंयतीपर शिवपुत्र संभाजी महाराज यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.
१२० लढाया लढणारे व सर्वच जिकणारे, जगातील पहिले बाल साहित्यिक, जगातील पहिले बुलेट प्रुफ जॉकेट तयार करणारे वीर पराक्रमी योध्दा छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्श आजच्या युवा पिढीने आत्मसात करावा असे आवाहन संयोजक सागर कनोजे यांनी यावेळी केले. बुंदीचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश सरोदे यांनी तर आभार प्रदर्शन सुरज देशमुख यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता रोशन खडसे, रोहित चकोले, अनिकेत कुंभलकर, श्याम मस्के, सोमेश मुळे, अक्षय देशमुख, निशांत मानकर आदीने सहकार्य केले. कार्यक्रमास गावातील युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.