नागपूर : अफजल खानाला संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर केला होता. या वाघनखांच्या सहाय्याने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. हीच वाघनखं नागपुरातील सिव्हिल लाईन्स येथील अजब बांगला (सेंट्रल म्युझियम) येथे प्रदर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे.महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत घोषणा केली.
नागपूरसह राज्यातील इतर म्युझियममध्येही ही वाघनखं ठेवली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची पौराणिक शस्त्र 19 जुलै रोजी भारतात येणार आहे. ते तीन वर्षांसाठी भारतात प्रदर्शित केले जाईल, ज्याची सुरुवात सातारा येथे भव्य उद्घाटन कार्यक्रमाने होईल. ही वाघ नख सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात प्रदर्शनासाठी आहे.
दरम्यान प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या अफजल खानाला संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर केला होता.
या वाघनखांच्या सहाय्याने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता.छत्रपती शिवरायांनी अफजलखानाला संपवण्यासाठी जी वाघनखं वापरली होती, त्या बद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. ही वाघनखं ब्रिटीनच्या ताब्यातून 3 वर्षासाठी भारतात आणली जाणार आहे.