रिच-२(कस्तुरचंद पार्क ते आटोमोटिव्ह चौक) चे निरीक्षण सुरु
नागपूर: महा मेट्रो नागपूरच्या रिच-२ अंतर्गत असलेल्या कस्तुरचंद पार्क ते आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन अंतर्गत असलेल्या मेट्रो स्टेशनची पाहणी मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) श्री जनक कुमार गर्ग आणि अधिकाऱ्यांनी आज पाहणी सुरु केली. मेट्रो रेल सुरुक्षा आयुक्त ३ दिवस नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दौऱ्या करिता आले आहेत. आज पहिल्या दिवशी श्री. गर्ग यांनी रिच-२ मार्गिकेवरील गड्डीगोदाम चौक,नारी रोड आणि आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशनची पाहणी केली.
आजच्या या पाहणी दरम्यान संचालक (प्रकल्प) श्री महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक अँड सिस्टिम) श्री सुनील माथूर, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रिच२) श्री. प्रकाश मुदलियार,कार्यकारी संचालक श्री उदय बोरवणकर, श्री रामनवास, श्री सिन्हा, महाव्यवस्थापक श्री सुधाकर उराडे,प्रकल्प संचालक (जनरल कंसल्टंट), श्री रामनाथन, सह महाव्यवस्थापक श्री नरेंद्र उपाध्याय आणि महा मेट्रो नागपूरचे इतर अधिकारी या निरीक्षणा दरम्यान प्रामुख्याने उपस्थित होते.
मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त यांनी स्टेशनवरील लिफ्ट,एस्केलेटर, फायर फायटिंग उपकरणे, स्टेशनच्या दोन्ही बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था, ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्मची पाहणी त्यांनी केली तसेच मेट्रो स्थानकांवरील प्रवाशांकरता आवश्यक असलेल्या उद्घोषणा, एएफसी गेट, अलार्म सारख्या विविध सोयी-सुविधांचा देखील आढावा घेतला आणि वरिष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाश्यांकरता असलेल्या सोईंचा आढावा त्यांनी आज घेतला.
या सोबतच तांत्रिक दृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथील ४ स्तरीय स्टील गर्डरची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली. महा मेट्रोने भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर ८०० टन वजनाचे स्टील गर्डर स्थापित केले असून देशात पहिल्यांदाच १६५० टन क्षमतेचे निर्माण कार्य शहरी भागात करण्यात आले आहे महा मेट्रोने नुकतेच याठिकाणी लोड टेस्ट यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.
कस्तुरचंद पार्क ते आटोमोटिव्ह मार्गिकेदरम्यान गड्डीगोदाम,कडबी चौक,इंदोरा चौक,नारी रोड मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. सिताबर्डी इंटरचेंज ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन दरम्यानचा १.६ किमीचा मार्ग २० ऑगस्ट २०२१ रोजी प्रवासी सेवेकरिता खुला करण्यात आला असून ज्यामध्ये झिरो माईल फ्रिडम पार्क आणि कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.