नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर शहरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर शहरासाठी प्रशासकीय दृष्टया महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. नागपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी राज्य शासनाला प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखवित मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मनपातील ४५ पदांच्या पदोन्नतीला मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे नागपूर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत करीत आनंद व्यक्त केला आहे.
राज्य सरकारद्वारे मनपातील पदोन्नतीला मान्यता प्रदान करण्यात आल्यामुळे आता सहायक आयुक्त / वार्ड अधिकारी श्री. गणेश राठोड यांना उपायुक्त पदी तर एकूण नऊ उपअभियंता यांना कार्यकारी अभियंता म्हणून तर ३४ कनिष्ठ अभियंता यांना उपअभियंता म्हणून आणि मुख्याध्यापक (माध्यमिक) श्रीमती साधना सयाम यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
नगर विकास विभागाच्या १० मे २०२३च्या शासन निर्णयान्वये नागपूर महानगरपालिकेच्या १७९८१ पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती तपासणी समिती गठीत करण्यात आली. या पदोन्नती तपासणी समितीच्या २४ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित बैठकीमध्ये समितीने पात्र अधिकाऱ्यांस सदर पदांवर पदोन्नती देण्यास शिफारस केली. त्याअनुषंगाने पदोन्नती समितीने शिफारस केलेल्या पात्र अधिकाऱ्यांना प्रशासकीय ठरावानुसार उपायुक्त या पदावर तसेच कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (यांत्रिकी), उपअभियंता (स्थापत्य), शिक्षणधिकारी (माध्यामिक) या पदांवर पदोन्नती देण्यास राज्य शासनाकडे शिफारस करण्यात आली व या पदांवर संबंधित पात्र अधिकाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विषयाकडे लक्ष देऊन पदोन्नतीस मान्यता देण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार नगर विकास विभागाच्या सह सचिव विद्या हम्पय्या यांनी आदेश जारी केले आहेत.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार एक सहायक आयुक्त / वार्ड अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना उपायुक्त पदावर, नऊ उपअभियंता यांना कार्यकारी अभियंता पदावर, ३४ कनिष्ठ अभियंता यांना उपअभियंता पदावर आणि एक मुख्याध्यापक (माध्यमिक) यांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदावर अशा एकूण ४५ अधिकाऱ्यांना पदोन्नती प्रदान करण्यात आली आहे. बऱ्याच वर्षानंतर अधिकाऱ्यांच्या इतक्या मोठया प्रमाणात झालेल्या पदोन्नतीमुळे मनपात अत्यंत उत्साह व आनंदाचे वातावरण असुन याबाबत मुखमंत्र्यांचे व शासनाचे आभार मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मानले आहे.
या अधिकाऱ्यांना मिळाली पदोन्नती
१. श्री. गणेश राठोड (सहा आयुक्त/ वॉर्ड अधिकारी), पदोन्नती – उपायुक्त
२. श्री. व्ही.यु. जुनघरे (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
३. श्री. एन.एस. बोबडे (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
४. श्री. एस. आर. गजभीये (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
५. श्री. प्रविण कोटांगळे (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
६. श्री. प्रशांत सोनकुसळे (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
७. श्री. आर.जे. दुपारे (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
८. श्री. मनोज गद्रे (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
९. श्री. गिरीष लिखार (उप अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
१०. श्री. राजेश गुरमुळे (उप अभियंता (यांत्रिकी)), पदोन्नती – कार्यकारी अभियंता (यांत्रिकी)
११. श्रीम. श्वेता अरूण दांडेकर (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
१२. श्रीम. वैजयंती विष्णू आडे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
१३. श्री. अभिजीत यशवंत नेताम (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
१४. श्री. यु.जी. खंडाते (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
१५. श्री. राजू बी. गौतम (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
१६. श्री. रवी झेड मांगे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
१७. श्री. विजेंद्र व्ही. सहारे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
१८. श्री. देवेंद्र एम. भोवते (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
१९. श्री. किशोर ए. माथुरकर (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
२०. श्री. विवेक तेलरांधे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
२१. श्री. जवाहर नायक (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
२२. श्री. प्रशांत एस. वाघमारे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
२३. श्री. संजय जी. इंगळे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
२४. श्री. जगदीश एम. बावनकुळे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
२५. श्री. मनोज एम. रंगारी (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
२६. श्री. संजय गुजर (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
२७. श्री. राहूल ए. देशमुख (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
२८. श्री. प्रमोद जी. मोकाडे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
२९. श्री. सारंग पींपळकर (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
३०. श्री. गजानन एच. वराडे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
३१. श्री. ए.आर. मोरे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
३२. श्री. मनोज संगीडवार (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
३३. श्रीम. पुष्पा जोगे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
३४. श्री. नरेंद्र तोटेवार (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
३५. श्री. प्रशांत नेहारे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
३६. श्री. राजेश वानखेडे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
३७. श्री. आर.एन. जीवतोडे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
३८. श्री. संजय पडोळे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
३९. श्री. प्रशांत सपाटे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
४०. श्री. उमेश मदने (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
४१. श्री. प्रदीप सरपाते (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
४२. श्री. दीपक ए. मेश्राम (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
४३. श्री. पुरुषोत्तम फाळके (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
४४. श्री. अभिजीत भुरे (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)), पदोन्नती – उप अभियंता (स्थापत्य)
४५. श्रीमती साधना सयाम (मुख्याध्यापक (माध्यमिक)), पदोन्नती – शिक्षणाधिकारी (माध्यमिक)