Published On : Wed, Dec 20th, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपुरातील रेशीमबागेत हेडगेवारांच्या स्मृतिस्थळाला केले अभिवादन !

Advertisement

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले.हेडगेवार यांच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रियाही शिंदे यांनी यावेळी प्रसार माध्यमांना दिली.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन असताना दरवर्षी रेशीमबागेत येऊन डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतो. येथे आल्यावर ऊर्जा मिळते. येथे येण्यामध्ये आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांमध्ये काहीच राजकरण नाही. आमचे हिंदुत्व हे विकासाचे हिंदुत्व आहे. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Advertisement

आमचे सरकार सर्वसामान्य माणसाचे सरकार असून एखाद्याला मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा असली तर ते नक्कीच मला भेटू शकतात. जनतेच्या सेवेची प्रेरणा येथून घेऊन काम करत आहोत. आम्ही देशाला काय देणार, हा विचार डॉ. हेडगेवार यांनी दिला, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांच्यासह अनेक नेते होते.