मुंबई :महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यादरम्यान सभागृहात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावावर मोठा घोळ होत असल्याचा आरोप करून विरोधकांनी सरकारला घेरले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून देण्यात जे सरकारी कर्मचारी घोळ निर्माण करतील, त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दरम्यान राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक जुलैपासून सुरू केलीय.
या योजने अंतर्गत 19 ते 65 वर्षातील महिलांना प्रत्येक महीन्याला 1500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
त्या नुसार योजनेचे अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला, पुरुष ग्रामपंचायत कार्यालयावर मोठी गर्दी करताना दिसत आहे. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.