Published On : Wed, Dec 20th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षणावर दिलेले भाषण हे संघासह भाजपने बनविलेला ‘ड्राफ्ट’ ; नाना पटोलेंचा हल्लाबोल

नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यापार्श्वभूमीवर नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाषण दिले. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य करत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

राज्यात विविध समाजाचे बंधाव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहे. विविध समाजाच्या आरक्षणावर जातनिहाय जनगणना हाच पर्याय आहे.

Gold Rate
Saturday 22 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काँग्रेस पक्षाने त्यासंदर्भातील आपली भूमिका सभागृहात मांडली आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे.

संघ व भारतीय जनता पक्षाला आरक्षणच संपवायचे आहे म्हणून महाराष्ट्रात जातीयतेढ निर्माण करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आरक्षणप्रश्नी केलेले भाषण हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेला ड्राफ्ट होता, असा घणाघात पटोले यांनी केला.

Advertisement