
Oplus_16908288
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमधील वादानंतर हिंसक संघर्ष उफाळला. यादरम्यान अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. इतकेच नाही तर पोलिसांवर दगडफेही करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हिंसाचारात जखमी झालेले पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशा शुभेच्छाही दिल्या. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्याच्या धाडसाचे कौतुकही केले. जखमी अधिकाऱ्याला भेटण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही रुग्णालयात पोहोचल्याची माहिती आहे.
दरम्यान नागपूर दंगलीमध्ये तीन डीसीपी जखमी झाले असून त्यातील एकावर चक्क कुऱ्हाडीने वार करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणारे जे कुणी असतील, त्यांना सोडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.
तसेच या घटनेत एक क्रेन, दोन जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत ३३ पोलीस जखमी झाले आहेत.
त्यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. तर एकूण ५ नागरिक जखमी झाले असून तिघांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.तसेच दोन रुग्णालयात आहेत. त्यापैकी एक आयसीयूत आहे”, अशी माहितीही फडणवीसांनी दिली.