मुंबई : राज्यात छत्रपती संभाजीनगर येथील मुघल राजा औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीने जोर धरला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीला पाठींबा दर्शविला. परंतु, यातील प्रमुख अडथळा देखील त्यांनी सांगितला.
त्यामुळे कायद्याच्या नियमानुसारच ही कारवाई केली जाऊ शकते, असेही फडणवीस म्हणाले.मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर याबाबत भाष्य केले.
समाजवादी पार्टीचे महाराष्ट्रातील नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबला क्रूर शासक मानत नाही असे विधान केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओरंगजेब हा उत्तम शासक होता, असा दावा त्यांनी केला.त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळात नवा वाद सुरू झाला. अखेर अबू आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले. दरम्यान, आता औरंगजेब यांची कबर नष्ट करण्यात यावी, अशी मागणी भाजपासह शिवसेना आमदारांकडून करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेब कबरीवरील मागणी भाष्य केले. आपल्या सर्वांनाही तेच हवे आहे, परंतु तुम्हाला ते कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे लागेल, कारण ते एक संरक्षित स्थळ आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काळात हे स्थळ एएसआय (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) च्या संरक्षणाखाली ठेवण्यात आले होते, त्यामुळे त्यावर कोणतीही कारवाई थेट करता येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले आहे.