Advertisement
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
त्यांच्या प्रचारार्थ पश्चिम नागपूरमध्ये हिंदी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे.
त्यामुळे योगी आदित्यनाथ यांची सभा पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात ठेवण्यात आली आहे. उमेदवारांना प्रचारासाठी अवघे बारा दिवस उरले आहे. भाजपसह काँग्रेसनेही लोकसभेच्या रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांच्या प्रचारासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरु केली.
केंद्रीय मंत्री व महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचार यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. मुख्यमंत्री प्रचारात सहभागी झाल्याने भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.