Advertisement
मुंबई: महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर बाबुभाई भवानजी, मुख्य सचिव डी.के.जैन, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, अतिरिक्त मनपा आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त (परिमंडळ-1) विजय बालमवार, नगरसेविका सुजाता सानप यांनीही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.