नागपूर : ‘विस्तारा एअरलाइन्स’च्या विमानात अवघ्या दीड वर्षीय चिमुकलीची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळं विमानाचं नागपूरच्या विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागले. त्यानतंर त्या चिमुकलीला KIMS-किंग्सवे हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटलने प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली.
बंगळुरूवरून दिल्लीला निघालेल्या विस्तारा एअरलाइन्स’च्या ही घटना घडली. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर दीड वर्षाच्या चिमुकलीला श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. गुदमरल्यासारखं होत आहे हे लक्षात येताच वैमानिकाने लगेच एअर ट्राफिक कंट्रोल रूमशी संपर्क साधला.
त्यानंतर विमान नागपूर विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले. विमानाची नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बंगळुरुहून दिल्लीला निघालेल्या या विमानात पाच डॉक्टरसुद्धा प्रवास करत होते. चिमुकलीची तब्येत खालावल्याचं लक्षात येताचं डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. यामुळे चिमुकलीचा जीव वाचला आहे. विमान लँडिंग झाल्यानंतर त्या चिमुकलीला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या चिमुकलीला जन्मापासूनच हृदयविकाराचा त्रास होता.याअगोदर तिच्यावर नारायणा हेल्थ, बेंगळुरू येथे हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. तिला KIMS-किंग्सवे हॉस्पिटल्समध्ये दाखल केल्यानंतर वाचण्यासाठी डॉक्टरांसह सर्व टीमने अथक प्रयत्न केले होते. मात्र आज पहाटे तीन अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग याआधीही नागपूर विमानतळावर विमानाचं आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आलं होतं. ही लँडिंग 21 ऑगस्टला रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली होती. मुंबईवरून रांचीला जात असलेल्या विमानातील एका प्रवाशाची तब्येत अचानक खालावल्यानं, विमानाची नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती.
या प्रवाशाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. देवानंद तिवारी असं मृत प्रवाशाचं नाव होतं. देवानंद तिवारी हे सीकेडी आणि क्षयरोगानं आजारी होते. विमान (विमान क्रमांक 6E 5093) मुंबईहून रांचीला जात असताना या प्रवाशाची विमानात मोठ्या प्रमाणात रक्ताची उलटी झाली होती.