चिखली (बुलढाणा)। लवकरच राज्यातील शाळाबाह्य मुले शोधण्याची मोहिम शालेय शिक्षण विभागातर्फे लवकरच आम्ही प्रारंभ करीत आहोत. या शोध मोहीमेमध्ये एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. याची खबरदारी घेतली जाईल. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगा हा शिक्षित झाला पाहिजे, हेच आमचे प्रमूख उदिृष्ट आहे. असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले.
चिखली येथे ‘शिक्षक-पालक संवाद मेळावा – 2015’ चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शिक्षक-पालक यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. भाजपच्या श्वेता महाले यांनी या संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते.
शिक्षक-पालकांना मार्गदर्शन करताना आणि त्याच्यांशी संवाद साधताना श्री. तावडे म्हणाले की राज्यामध्ये अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अनेक विद्यार्थी शिक्षण हे शिक्षणाकरीताच करतात, नंतर मात्र अर्धवट सोडून देतात किंवा अशी मुले अन्य ठिकाणी स्थलांतरित होत असल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी लवकरच ही मोहीम आम्ही सुरु करणार आहोत असेही श्री. तावडे यांनी स्पष्ट सुरु केले.
आपल्याला महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात चांगली पिढी घडवायची आहे. विद्यार्थ्यांना केवळ भोकंपट्टी आणि पुस्तकी माहितीच्या पलिकडे शिक्षण द्यावयाचे आहे. त्यामुळे शिक्षकांनी चांगला विद्यार्थी कसा घडेल याचा विचार करावा. असे आव्हानही श्री. तावडे यांनी केले.
आपल्या मार्गदर्शनानंतर तावडे यांनी उपस्थित शिक्षक-पालक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना सविस्तरपणे उत्तरे दिली.