कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गाचे चारपदरी सिमेंट रस्त्याचे काम केसीसी बिल्डकॉन कंपनी व्दारे सुरू आहे . महामार्ग लगतची नाली तोडुन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम मंद गतीने सुरू असल्याने तसेच शहरातील पाणी निकासी(वाहुन) करणारी नाली तुटल्याने पाणी जागोजागी साचुन असल्यामुळे नाल्याचे पाणी व दोन दिवस पङलेल्या पावसाचे पाणी सरकारी दवाखान्या कङे जाणा-या मार्गावर शिरून मोठय़ा प्रमाणात जमा झाल्याने तेथे राहणाऱ्या नागरिकांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या रस्त्याने ये-जा करण्या-या नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत असुन या साचलेल्या दुषित पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यास्तव कन्हान -पिंपरी नगरपरिषदेनी त्वरित लक्ष देऊन पाणी निकासी करण्याची व्यवस्था करण्यात यावी.
जोरदार पाऊस आल्यास लोकांच्या घरात पाणी शिरून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्यास तिव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिय नागरिक, सामाजिक कार्यकर्ता रिषभ बावनकर, माधव वैध, चंदन मेश्राम, धर्मेन्द्र गणवीर, चंद्रशेखर वंजारी, हरिओम,हर्ष पाटील, रामविशाल यादव, गुलाबराव वानखेङे, हरी इंगोले, मोहन ठवकर, गब्बर वाघधरे, गोंडाणे व शहरवासी यांनी दिला आहे .