कामठी :-वाठोडा भागातील महाकाळकर ले आउट येथील रहिवाश्यांची घरे पाडण्याच्या निर्णयाविरुद्ध परिसरात असंतोष पसरला .वाठोडा चौकात नागरिकांनी तासभर रस्ता रोको आंदोलन करून अंगातील शर्ट काढून अर्धनग्न आंदोलन केले.तसेच कामठी तालुका कांग्रेस महिलाध्यक्ष प्रा अवंतीकाताई लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी हनुमांननगर येथील न एनएमआरडिए कार्यकारी अभियंत्यांना सामूहिक निवेदन दिले-
एनएम एम आर डी ऐ चे हनुमाननगर झोन आधिकारी अवस्थी आणि नागपूर महानगर पालिका अधिकारी ठाकरे यांच्या नेतृत्वात महाकाळकर लेआऊट येथिल रहिवास्यांची घरे पाडण्याचा तुगलकी निर्णय घेण्यात आला.सहा घरे पाडण्यात आली आणि निर्सगामुळे पाऊस आला व इतर घरे वाचली. एकिकडे हजारो झोपडपत्टिवासीयांना पट्टे वाटप करणार , अतिक्रमण नियमित करणार असल्याचे व गरिबांना घरे देण्याचे आश्वासन देत सरकार सत्तेवर आली आणि दुसरिकडे पै-पै पैसा जोडुन प्लॉट घेवुन घरे बांधुन राहणा-या गरिबांना बेघर करण्याचे काम केल्या जात आहे. तिन वर्षापासुन याविरोधात लढाई सुरु आहे. यापुर्विही प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात या गरिबांची घरे वाचविण्यासाठी मोठमोठी आंदोलने झाली. निवेदनं देण्यात आली केंद्रियमंत्री गडकरी साहेब आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी गरिबांवर अन्याय होणार नाही. पुणर्वसन करण्यात येईल असे आश्वासन दिले.
अनेकांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहे. काहिंना नागपूर महानगर पालिका विरोधात स्थगनादेश तर काहिंना जैसे थे चे आदेश मिळाले. ही जागा नागपुर सुधार प्रन्यास च्या मालकीची असुन ती नागपुर महानगर पालीकेला हस्तांतरित करण्यात आली. व ना.सु.प्र तर्फे सिंबासिस व क्रिडासंकुल साठी राखिव करण्यात आली. असे उत्तर अधिका-यांकडुन ऐकायला मिळते. मग मागिल पन्नास वर्षापासुन ती जागा शेतक-याच्याच नावावर कशी? या जागांची अनेकदा खरेदि विक्री कशी झाली? दुय्यम निबंधकाकडुन तिची नोंदणी कशी झाली? प्लॉट पाडुन विकल्या गेले तेव्हा नासुप्र व मनपा अधिकारी काय करत होते? ही जागा अकृषक कशी झाली? आणि आता या सर्व भ्रष्ट शासन प्रशासन व्यवस्थेमुळे जन्मभ-याची कमाई खर्चुन ज्या छत उभे केले अशा गरिबांना पुन्हा बेघर करण्याचा डाव या भ्रष्न शासन प्रशासनाने रचला. यांचा कारस्थानी डाव म्हणजे आजपर्यंत नोटिस मनपाच्या माध्यमातुन देण्यात आले.
मनपाविरोधातच न्यायालयिन लढाई सुरु आहे आणि आता मात्र एम एम आर डि ए च्या माध्यमातुन ऐक दिवस आधी नोटिस दिला. नोटिसचे उत्तर द्यायला वेळही दिला नाही आणि दुस-याच दिवशी कारवाई केली. आजही रविवार असतांनाही कारवाई करण्यासठी एम एम आर डी ऐ अधिकारी अवस्थी यांच्यसह टिम उपस्थित होती परंतु जनतेचा आक्रोश पाहुन टिम कारवाई न करताच परत गेली. संतप्त जनता रस्त्यावर उतरली नारेबाजी करत वाठोडा चौकात आली रस्तारोको केला. जवळपास एक तास महिला व पुरुषांनी रांगा करुन आडवे होवुन वाठोडा चौक रोकुन धरला. ट्रक व गाड्यांचा मोठ्या रांगाच्या रांगा अडलेल्या होत्या. भाजपा सरकार नासुप्र, मनपा व एम एम अार डी ऐ विरोधात नारेबाजी होत होती.
आमची घरे टुटली तेव्हा तुम्ही का आले नाहित? .तसेच पावसाळा असताना निवासी घरे तोडायची का केली?असा संतप्त सवाल शिष्टमंडळाने मनपा आयुक्ताला विचारला.
यावेळी कांग्रेस नेता कीशोर गजभिये, प्रदेश कांग्रेस कमिटी चे महासचिव माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे, जिल्हा सचिव स्वप्नील राऊत, आशिष मल्लवार, अश्वजित रामटेके,चक्रधर बाबरे, शशांक नागभीडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते
संदीप कांबळे कामठी