Published On : Thu, Jul 16th, 2020

रिकाम्या प्लॉटवर टॉवर लावण्यास नागरिकांचा विरोध

Advertisement

नागपूर : प्रभाग २९ मधील हुडकेशवर रोड वरील, श्याम नगर येथे मोबाईल टावर न लावण्याबाबत निवेदन देण्यात आले. उपशहर प्रमुख शिवसेना दक्षिण नागपूर येथील दिपक पोहनेकर याच्या मार्गदर्शनात व विनोद शाहु याच्या नेतृत्वात हनुमान नगर झोन क्रमांक 3 वरिष्ठ अधिकारी उप इंजिनिअर प्रकाशजी धावडे याना निवेदन देण्यात आले. तसेच यांना नागरिकांचे मत काय आहे ते समजावुन सांगितले.

खाली प्लाट वर टाॅवर लावत असल्याचे नागरिकांना कळले आणी जवळ च पाचशे मीटर अंतरावर शाळा आहे. टाॅवरमुळे जो त्रास नागरिकांना होईल तो टाळता येणार नाही हे लक्षात घे ता नागरिकांनी गर्दी व एकत्रित येऊन विरोध दर्शविला आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

म्हणूनच टावर ला स्थगिती द्यावी अशी विनंती उपशहर प्रमुख दिपक पोह नेकर यांनी व वस्तीतील नागरिकांनी स्थगिती ची मागणी केली. याप्रसंगी कार्तिक नारनवरे, राजु भाऊ पाटिल उपस्थित होते.

Advertisement