नागपूर : शहरातील मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील काही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती डीसीपी राहुल मदने यांनी दिली.
तक्रारदार सय्यद शाहबाज अली उर्फ बाबा (वय 21 वर्षे,रा. संत ज्ञानेश्वर सोसायटी,मानकापूर) त्याचा मावशीचा मुलगा लकीला सौरभ नायर (किराड ले आउट मॅक्स हॉस्पिटल जवळ)नावाच्या आरोपीकडून वारंवार जिवेमारण्याच्या धमक्या येत होत्या. सय्यदने दोघांचे भांडण मिटविण्यासाठी सौरभशी फोनवर संवाद साधला. सौरभने दोघांनाही पागलखाना चौकात बोलवले. यादरम्यान सौरभसोबत शिवम पांडे (लोकविहार कॉलनी गोधनी) याच्यासह इतर सहा जण घटनास्थळी उपस्थित होते.तसे सय्यद आणि लकीसोबतही त्यांचे ५ साथीदार होते. सौरभ आणि लकीने एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि वाद चिघळला. दोन्ही गटात तूफान हाणामारी झाली.
दरम्यान या घटनेप्रकरणी प्रकरणी दोन्ही गटातील फिर्यादीने तक्रार दिली असून मानकापूर पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरु केला.