Published On : Fri, Dec 29th, 2017

‘स्वच्छता ॲम्बेसेडर’ने केली महापौरांसमवेत जनजागृती

Advertisement

नागपूर : ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत जानेवारी महिन्यात होणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षणा’बाबत लोकांना माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेद्वारे नियुक्त केलेल्या स्वच्छता ॲम्बेसेडरनी शहरात फिरून जनजागृती केली. महापौर नंदा जिचकार यांनीही त्यांच्यासोबत रॅलीमध्ये सहभागी होऊन उत्साह वाढविला.

स्वच्छता ॲम्बेसेडर आणि महापौर नंदा जिचकार यांनी संयुक्तरित्या रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छतेविषयक जनजागृती केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, स्वच्छता ॲम्बेसेडर सर्वश्री डॉ.चंद्रशेखर मेश्राम, डॉ.उदय बोधनकर, कौस्तभ चॅटर्जी, मॅरेथॉनपटू डॉ. अमित समर्थ, कवी मधुप पांडेय, आर.जे. निकेता, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा मुख्यालयातून या रॅलीला शुभारंभ झाला. यावेळी रेल्वे स्टेशनच्या परिसरातील दुकानदांराच्या स्वच्छतेबाबत समस्या जाणून घेतल्या. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत महापौर नंदा जिचकार यांनी माहिती दिली. आपली दुकाने स्वच्छ ठेवण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घ्यावा, जेणेकरून आपले शहर स्वच्छ शहराच्या यादीत अग्रक्रमांकावर येईल, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी दुकानदारांना केले.

यावेळी ग्रीन व्हिजीलच्या कार्यकर्त्यांनी दुकानदारांच्या व नागरिकांच्या स्मार्टफोनवर ‘स्वच्छता ॲप’ डाऊनलोड करून दिली. नागरिकांनी या रॅलीला चांगला प्रतिसाद दिला. शहरातील स्वच्छतेत नागपूर आता सुधारतेय, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्रातून एक चमू येणार आहे. त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. त्यांना सहकार्य करा. आपल्या शहराला स्वच्छ शहर म्हणून लौकिक मिळवून द्या, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

कार्यक्रमाला मनपातील पशुचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले, स्वास्थ निरीक्षक रोहीदास राठोड, दहाही झोनचे झोनल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कर्तव्यदक्ष वाहनचालकांचा सत्कार

मनपाद्वारे सुरू करण्यात आलेल्या डम्पिंग यार्डमध्ये रोजचा १२० मॅट्रिक टन कचरा डम्प केला जातो. हा कचरा व्यवस्थितरीत्या वाहून नेणाऱ्या तीन वाहनचालकांचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी . अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, लक्ष्मीनगर झोन सहायक आयुक्त सुवर्णा दखणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, स्वच्छता ॲम्बेसेडर सर्वश्री डॉ.चंद्रशेखर मेश्राम, डॉ.उदय बोधनकर, कौस्तभ चॅटर्जी, डॉ. अमित समर्थ, मधुप पांडे आर.जे. निकेता प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement