Published On : Tue, Feb 28th, 2023
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छतेचा जागर करणारा स्विमिथॉन उपक्रम 5 मार्च रोजी

‘स्विम फॉर क्लीन, ब्युटीफूल अँड हेल्दी नागपूर’ मनपा आणि जेडी स्पोर्ट्स फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
Advertisement

\
नागपूर : घराघरात स्वच्छतेचा जागर व्हावा आणि ‘स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नागपूर’ चा संदेश शहरातील प्रत्येकापर्यंत पोहोचावा याकरिता नागपूर महानगरपालिका आणि जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ क्रीडांगण’ उपक्रमांतर्गत रविवार 5 मार्च रोजी दुपारी 4.30 ते 7.30 वाजता दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, वैशाली नगर, स्थित मनपा स्विमिंग पूल येथे भव्य ‘स्विम फॉर क्लीन, ब्युटीफूल, अँड हेल्दी नागपूर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवावा, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी केले आहे.

‘स्वच्छ, सुंदर व स्वस्थ नागपूर’ हा संदेश शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका व जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ क्रीडांगण” अंतर्गत विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमाकरिता क्रीडांगण प्रमुख यांना नोंदणी करण्यासाठी आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे. उप्रक्रमांतर्गत किमान १०० क्रीडांगणांची नोंदणी होणार असे अपेक्षित आहे. क्रीडांगणावरील खेळाडू, प्रशिक्षक, संघटक नागरिक इत्यादींच्या मदतीने स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे. प्रत्येक क्रीडांगणावर किमान एक समन्वयक निवडण्यात येणार आहे. नागपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ ही संकल्पना रुजविण्यासाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून मनपा आणि जेडी स्पोर्ट्स फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानुसार रविवार 5 मार्च रोजी “स्विम फॉर क्लीन, ब्युटीफूल व अँड हेल्दी” हा निःशुल्क उपक्रम आयोजिण्यात आला आहे. यामध्ये शहरातील हौशी जलतरणपटू दुपारी 4.30 पासून तर 7.30 वाजेपर्यंत रिले पद्धतीने पोहणार आहेत. ही जलतरण स्पर्धा नसून, एक स्विमॅथॉन प्रमाणे स्वीमर सतत तीन तास देखील स्विमिंग करू शकतो. सहभागी झालेल्या स्वीमरने किमान 30 मिनिटे पोहणे अपेक्षित आहे. सहभागी होणाऱ्या जलतरणपटू द्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे.

नागपूर शहराकरिता एक सामाजिक उपक्रम म्हणून आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये जलतरणपटू तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी केले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व त्याचप्रमाणे स्वच्छतेतून स्वस्थ आरोग्याकडे जाण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न नागपूर महानगरपालिका व जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या विद्यमाने करण्यात येणार असल्याचे जेडी स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सचिव व “स्वच्छ क्रीडांगण” या उपक्रमाचे मुख्य समन्वयक जयंत दुबळे यांनी सांगितले.

नागपूर शहरामध्ये प्रथमच होणाऱ्या या अभिनव उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेले 12 ते 65 वयोगटातील महिला / पुरुष ज्यांना किमान 30 मिनिट सतत पोहण्याचा सराव आहे, अशा जलतरुणपटूंनी आपल्या नावाची नोंदणी 3 मार्चपूर्वी क्यू आर कोड द्वारे करावी अधिक माहितीसाठी अधिक माहिती करिता जयंत दुबळे 9975590227, सुशील दुरुगकर 9834746369, नैना गोखले 9350836508, तृप्ती जोध 7798686053, श्रुती गांधी 9823912050 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जेडी स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव व आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत दुबळे यांनी केले आहे. किमान अर्धा तास स्विमिंग करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट जलतरणाचे प्रदर्शन करणाऱ्या जलतरणपटूंना टी-शर्ट प्रदान करण्यात येईल.

Advertisement
Advertisement