नागपूर: प्रभाग क्र १३ अंतर्गत येणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन दि.२ एप्रिल २०१८ ते १३ एप्रिल २०१८ पर्यंत करण्यात आले होते. आज या उन्हाळी शिबिराचा समापन समारोह आयोजित करण्यातआला होता. या प्रसंगी दिलीप दिवे, सभापती, शिक्षण समिती, संध्या मेडपल्लीवार, शिक्षणाधिकारी, नगरसेवक अमर बागडे, जानकी गणेशन, रवी वाघमारे, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक प्रामुख्याने उपस्तिथ होते. या शिबिराचे आयोजन नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनी केले होते. या शिबिरामध्ये प्रभागातील वाल्मिकी हिंदी शाळा,रामनगर मराठी शाळा, गोकुळपेठ हिंदी शाळा व हजारीपहाड मराठी शाळा या शाळेतील सुमारे १२५ विध्यार्थ्यांनीं सहभाग घेतला होता. या शिबिरात विध्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश, योगा, सेल्फ डिफेन्स, मोटिव्हेशन, आत्मविश्वास, क्रिएटिव्ह आर्ट आदी विषयावरती तज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.
यावेळी या दहा दिवसां मध्ये विध्यार्थी जे काही शिकलेत त्याची उत्कृष्ट रित्या मांडणी पाहुण्यां समोर केली.
या प्रसंगी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सभापती दिलीप दिवे म्हणाले कि या अश्या शिबिरामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असते. अश्या उन्हाळी शिबिराचे आयोजन महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत घेण्यात यावे असा प्रस्ताव मी घेणार आहे. प्रत्येक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील महानगरपालिकेच्या शाळेत अश्या उन्हाळी शिबिराचे आयोजन करावे.मी नगरसेविका डॉ.परिणीता फुके यांचे विशेष अभिनंदन करतो.त्या मागील वर्षांपासून या उन्हाळी शिबिराचे आयोजन करीत आहेत.
या प्रसंगी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नगरसेविका डॉ. परिणीता फुके म्हणाल्या कि महानगरपालिकेच्या शाळेतील विध्यार्थी काहीतरी वेगळ शिकावेत या हेतूने या उन्हाळी शिबिराचे आयोजन केले. कारण माझी सुद्धा शाळा आहे आणि खाजगी शाळेतील विध्यार्थ्यांना कडे पालकांचे लक्ष असते व ते आपल्या पाल्याला अश्या उन्हाळी शिबिरामध्ये पाठवीत असतात.या हेतूने मी या शिबिराचे आयोजन प्रभागातील महानगरपालिकेच्या शाळेमध्ये करण्याचे ठरविले व मागील वर्षीपासून हे शिबीर यशस्वी रित्या पार पाडीत आहे.
या उन्हाळी शिबिरामध्ये पूजा बोकडे, प्रांजली राउत, स्नेहा पोटभरे, सुप्रिया वखरे, विजय चिचघरे, कविता शाह, शमा चंदेल यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेत. या प्रसंगी या सर्वांचे सत्कार करण्यात आला. तसेच विशेष सहकार्य केले म्हणून शाळेतील मुख्याध्यापिका बिना करोसिया, श्रद्धा मडावी, प्रेरणा मूलकालवर व बघेले मॅडम यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मिताली दुबे हिने केले तर आभार पायल दीप हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता शाह यांनी केले.या प्रसंगी शाळेतील विध्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.