Published On : Thu, Feb 27th, 2025
By Nagpur Today Nagpur News

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र आदासा येथे रविवारी सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Advertisement

नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून रविवार, दि. २ मार्च २०२५ रोजी श्रीक्षेत्र आदासा येथे सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

रविवार दि. २ मार्चला सकाळी ७.१५ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. भाविकांनी सकाळी ७ पर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचणे अपेक्षित आहे. यावेळी ना. श्री. नितीन गडकरी स्वतः सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. श्री गणपती अथर्वशीर्ष स्तोत्राच्या २१ आवर्तनांचे यावेळी सामूहिक पठण होणार आहे. त्यानंतर आरती होईल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आयोजन समितीने नागपूर शहर व नागपूर ग्रामीणमधील सर्व भाविकांना आमंत्रित केले आहे. संस्था, संघटना, धार्मिक प्रतिष्ठानांसह भाविक आपल्या कुटुंबासह व्यक्तिशः देखील यामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. गणेशभक्त स्वतःच्या वाहनाने कार्यक्रमस्थळी येऊ शकतात.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाला येताना मंगलवेष परिधान करून येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आदासा येथील श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात आपण सर्व गणेश भक्तांनी उत्साहात सहभागी व्हावे ही विनंती आयोजन समिती द्वारे करण्यात आली आहे. या उपक्रमाशी संबंधित अधिक माहितीसाठी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

सायंकाळी भक्ती गीतांची मेजवानी
रविवार, दि. २ मार्चला सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायक मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांचा भक्तीगीते व भजनांचा कार्यक्रम होईल. धापेवाडा येथील नदी शेजारील प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement