Advertisement
नागपूर : नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सिव्हिल लाईन्स स्थित आपल्या निवासस्थानी आज सकाळी सूर्योदयानंतर झेंडावंदन केले.
जिल्ह्यामध्ये हरघर तिरंगा मोहिमेत प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्ह्याच्या महानगर व ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात तिरंगा उपलब्ध असून नागरिकांनी ध्वज संहिता पाळत आपल्या घरावर 13 ते 15 या काळामध्ये ध्वजारोहण करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.