Advertisement
नागपूर: नागपूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नुकतेच विजयी झालेले आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबई येथे विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
यापूर्वी कामठी विधानसभा मतदारसंघातून आ. बावनकुळे यांनी तीनदा विजय मिळविला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी असून नागपूर, भंडारा व वर्धा या तीन जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तसेच महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली आहे.
आमदार म्हणून ते आताही नागपूर व जिल्ह्याच्या जनतेचे अनेक समस्या विधान परिषदेत मांडून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.