नागपूर: पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १) प्रभाग क्रमांक ४ येथील गुलमोहर नगर, धनलक्ष्मी सोसायटी येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आ. कृष्णा खोपडे यांच्या मार्गदर्शनात लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे यांच्या प्रभागात मनपा विकास निधीतून रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोद पेंडके, नगरसेवक राजकुमार साहू, सामाजिक कार्यकर्ते शैलेश शाहू, वर्ष चानोरे, शीला ठाकरे, प्रेम कुऱ्हे, विवेक ठवकर, अरुण हरोडे, संतोष लड्ढा, पवन तिवारी, राजेन्द्र राजपूत, सुबोध मानवतकर, नंदलाल बिसेन, राजेश ठाकरे, पारेंद्र बोपचे, भरतलाल साहू, सुशील ठाकरे, सागर भिवगडे, तुषार राऊत, प्रतिमा उचीबगले, जागेश्वर हिरवानी, अरविंद झाडे, उत्तम पोटे, मोहन ठाकरे, त्रिलोकी महतो, गोपाल समर्थ, प्रकाश शेन्द्रे, शिल्पा देशमुख, कुंदा फुन्दे, पुष्पा डोरे, दिनेश दिगरसे, दीपा मुंडेकर आदी उपस्थित होते.