शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या शतकोत्तर जयंती उत्सवा निमीत्य धनवटे नॅशनल कॉलेजच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागव्दारे विविध आंतर वर्गीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करूण महाविद्यालयात क्रीडा उत्सव साजरा करण्यात आला. या आंतर वर्गीय क्रीडा स्पर्धामध्ये वैयक्तिक एथलेटिक्स-100 मिटर धावणे, गोळा फेक, लांबउडी, चेस तर रस्साखेच, व्हॅलीबॉल, कबड्डी बास्केटबॉल, कोर्फबॉल इत्यादी सांघीक खेळाचा समावेश आहे.
क्रीडा उत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ओ. एस. देशमुख यांच्या हस्ते सकाळी 10.00 वाजता महाविद्यालयाच्या क्रीडागणावर डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले. या प्रसंगी सर्वप्रथम 100 मिटर धावणे मुले मूली च्या स्पर्धा घेण्यात आल्या. या वेळी विभाग प्रमुख डॉ देवेन्द्र वानखडे प्रा जयंत जिचकार सह सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठया सख्येने खेलाडू उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला. प्रास्ताविक डॉ वंदना इंगले व आभार डॉ सुभाष दाढे यांनी म्हानले.
या विजयी व उपविजयी संघांना रोख पारिताशिके व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
उदया सकाळी वैयक्तिक स्पर्धा- गोळा फेक, इत्यादी सकाळी 8.00 वाजता सुरू होतील.