Advertisement
नागपूर : तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) गुरुवारी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ८३.५० रुपयांनी कमी केल्या आहेत. नवीन दर १ जूनपासून लागू होणार आहेत. तथापि, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असे OMCs ने नमूद केले.
गेल्या महिन्यात १ मे पासून एलपीजी सिलिंडरची किंमत १७१. ५० रुपयांनी कमी करण्यात आली होती.
व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारल्या जातात. त्यामुळे आजपासून नवे दर लागू होणार आहेत. तेल विपणन कंपन्यांनी शेवटच्या मे महिन्यात घरगुती एलपीजीच्या किमती बदलल्या. सध्या, नागपुरात घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत प्रति १४. २ किलो सिलिंडर १,१५५ रुपये आहे.