आयुक्केतांनी केली भांडेवाडीतील डॉग शेल्टरची केली पाहणी
नागपूर : . शहरातील भटक्या/ मोकाट श्वानांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे, तसेच भांडेवाडी येथे निर्बीजीकरणासाठी शस्त्रक्रिया केंद्र उभारण्यात यावे, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने भटक्या/मोकाट श्वानांसाठी भांडेवाडी येथे डॉग शेल्टर उभारण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. यांनी बुधवार(ता. २) रोजी डॉग शेल्टरची पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, उपायुक्त (घनकचरा) डॉ गजेंद्र महाले, कार्यकारी अभियंता श्री डहाके, कनिष्ठ अभियंता श्री काकडे, झोनल स्वच्छता अधिकारी श्री रोहिदास राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
या शेल्टर होमच्या पाहणी दरम्यान मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी, यांनी डॉग शेल्टर होमची रंगरंगोटी करण्याचे निर्देश दिले. तसेच येथील स्वच्छता ठेवा आणि सौंदर्यीकरणाकरीता विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश दिले.
नागपूर महानगरपालिकेचे डॉग शेल्टर होम भटक्या कुत्र्यांच्या उपचारामध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. सध्यस्थिती या शेल्टर होम मध्ये जवळपास १०० श्वान आहेत. भांडेवाडी येथे २.५ एकर मध्ये पसरलेले शेल्टर होम मध्ये जख्मी कुत्र्यांना ठेवले जाते. तसेच त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था सुध्दा केली केली जात आहे. आयुक्तांनी त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेची सुद्धा पाहणी करून आवश्यक निर्देश संबंधितांना दिले.