Advertisement
नागपूर : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी (ता.१२) महापौर संदीप जोशी यांची अनौपचारिक भेट घेतली. मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये जाउन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौरांची भेट घेतली.
सुमारे १५ ते २० मिनिटे महापौरांनी आयुक्तांशी संवाद साधला. शहरातील विविध समस्या आणि प्रकल्प अशा विविध विषयांवर यावेळी महापौर व आयुक्तांनी चर्चा केली.