Published On : Thu, Mar 20th, 2025
By Nagpur Today Nagpur News

गोंडराजे बख्त बुलंदशहा यांच्या समाधी स्थळाचे काम तात्काळ पूर्ण करा – आमदार प्रवीण दटके

आदिवासींच्या अस्मितेसाठी दटकेंचा रुद्रावतार
Advertisement

नागपूर : नागपूर शहर वसविणारे नागपूर नगरीचे संस्थापक गोंडराजे बख्त बुलंदशहा यांच्या समाधीचे संवर्धन करण्यासाठी ९ कोटी ७२ लाखांचा आराखडा नागपूर सुधार प्रन्यासने राज्य शासनाकडे आहे, त्याला 9 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही काम प्रलंबित आहे.

या ठिकाणी अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे.हे अतिक्रमण तत्काळ काढून आवश्यक तो निधी देण्याचे NIT आणि NMC ला द्यावेत अशी मागणी केली.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सक्करधरा येथे असलेल्या या समाधी स्थळाचे कामाला गती मिळावी अशी मागणी आदिवासी समाज बांधवांकडून होत असल्याची माहिती दटके यांनी दिली.

नागपूर सुधार प्रन्यासकडे हे काम असून समाधीचे संवर्धन होऊन नागपूरचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा यासाठी हा प्रकल्प पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे अशी मागणी आमदार दटके यांनी केली.

आजच या ठिकाणचे अतिक्रमण काढून निधी देण्याचे आदेश NIT ला देत असल्याचे मंत्री श्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितले.

Advertisement
Advertisement