नागपूर : नागपूर शहरात शनिवार-रविवार लॉकडाऊन जाहीर केले असताना सर्व काही बंद असताना शनिवारी दारू दुकाने सुरु होती. नागरिकांकडून तिखट प्रतिक्रिया व सोशल मिडीयावर सरकारचा फज्जा झाल्यानंतर रविवार दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.
मात्र दारूचे पार्सल विक्रीची अनुमती देण्यात आली. एकीकडे चहा दुकाने बंद, नाश्ता दुकाने बंद, चिकन-मटन दुकाने बंद मात्र दारूचे दुकानावर इतका मोह कां? नागरिकांच्या जिवापेक्षा तिजोरी भरण्याकडे सरकारचे लक्ष आहे काय? असा प्रश्न या ठिकाणी साहजिकच निर्माण होतो.
लॉकडाऊनमध्ये अनेकांची वीज कापण्यात आली, हे योग्य आहे काय?
लॉकडाऊन मध्ये सर्व नागरिक आपापल्या घरी असताना महावितरणचे कर्मचारी मात्र वीज बिलाच्या वसुलीसाठी दारोदारी फिरत होते. वीज बिल भरण्याची सक्ती करीत होते. अनेक नागरिकांची वीज कापण्यात देखील महावितरणने माणुसकी बागळली नाही.
नागपुरातला उर्जामंत्री असताना अशा पद्धतीने दडपशाहीचे वातावरण निर्माण होणे, ही दुर्दैवी बाब आहे. नागपुरात कोरोना रिटर्न्सची शक्यता असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मुलभूत गरजेवर आळा घालणे, हेच राज्य सरकारचे धोरण आहे काय? याबाबत खुलासा करावा किंवा जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास असमर्थ असल्यामुळे राजीनामा दयावा.
राज्य सरकारच्या जनविरोधी भूमिकेवर आमदार कृष्णा खोपडे यानी सडेतोड टीका केली.