नागपूर : पारडी उड्डाणपुलाच्या नव्याने उद्घाटन झालेल्या भागातून काँक्रीट पडल्याने कारचे नुकसान झाले. या घटनेनंतर नागरिकांनी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. तसेच विरोधकांनीही भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली.
आमदार कृष्णा खोपडे यांनी या उड्डाणपुलाचे दोन दिवसांपूर्वी उदघाटन केले होते. उड्डाणपुलाचे काँक्रीट कोसळल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली खोपडे यांनी केली. खोपडे म्हणाले की, ते यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून चौकशीची मागणी करणार आहेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पूर्व नागपुरातील भंडारा रोडवरील वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. २०२३ मध्ये, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उड्डाणपुलाचे तीन भाग वाहतुकीसाठी खुले केले.
तथापि, एचबी टाउनच्या सेंट्रल अव्हेन्यू आणि भांडेवाडी विभागाचे काम पूर्ण झाले नव्हते . दोन्ही भागांचे काम पूर्ण झाल्यानंतर, गुरुवारी मोठ्या थाटामाटात पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नागपूरचे माजी आमदार कृष्णा खोपडे यांनी मोठ्या संख्येने सामान्य नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. यादरम्यान खोपडे यांनी स्वतः उड्डाणपुलावर गाडी चालवली होती.