Published On : Wed, Aug 9th, 2023

नागपुरातील भाजपा नेत्या सना खानचा खून केल्याची कबुली; एका आरोपीला अटक

मृतदेह मध्य प्रदेशातील हिरन नदीत फेकल्याची माहिती
Advertisement

नागपूर : स्थानिक भाजपच्या नेत्या सना खान हिचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सनाच्या हत्याकांडात मुख्य आरोपी अमित शाहूचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. त्याने सनाचा खून करून मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. या हत्याप्रकरणाचा पुढील तपास जबलपूर पोलीस करीत आहे.

माहितीनुसार, भाजपा नेत्या सना खान १ ऑगस्टला जबलपूरमधील मित्र अमित ऊर्फ पप्पू साहू याला भेटायला गेली होती. अमितच्या घरी मुक्कामी होती. अमितचा ढाबा आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची भनक अमितच्या पत्नीला लागली. २ ऑगस्टपासून सना ही बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिच्या आईने मानकापूर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

Advertisement

मानकापूर पोलिसांचे पथक जबलपूरला गेल्यानंतर अमित शाहू हा फरार झाला होता. त्याने ढाब्याला कुलूप लावले होते. नोकरांनीही तेथून पळ काढला होता. शेवटी पोलिसांनी तांत्रिक आधारे अमितचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. त्याने अमितच्या कारच्या डिक्कीत रक्त सांडलेले होते. ते रक्ताने माखलेली कारची डिक्की स्वच्छ केल्याची कबुली दिली. सना हिचा मृतदेह हिरन नदित फेकल्याचा खुलासा त्याने केल्याने तिचा खून झाल्याचे निश्चित झाले आहे. जबलपूर पोलिसांच्या हाती या हत्याकांडाचे प्रकरण सोपविण्यात आले असून आरोपी जीतेंद्रलाही गोराबाजार-जबलपूर पोलिसांनी अटक केली.

सनाचा मृतदेह मिळत नाही, तोपर्यंत तिचा खून झाला असे म्हणता येणार नाही. परंतु, नोकराने दिलेल्या माहितीवरून सनाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती ठाणेदार शुभांगी वानखडे यांनी दिली.