नागपूर : महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला पेपर फुटल्यामुळे नागपुरात परीक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
नागपूरमध्ये पीएचडी फेलोशिप ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु या परीक्षेचे संपूर्ण पेपर पहिलेच फुटेलेले होते. तसेच विद्यार्थ्यांना झेरॉक्स कॉपी देण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे. पेपर फुटल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. सर्व विद्यार्थी कमला नेहरू महाविद्यालयावर मैदानात पटांगणामध्ये उभे राहून आंदोलन करत आहेत.
नागपुर आणि पुण्यात पेपर फुटीची घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याचेच पडसाद राज्यभरात उमटायला लागले आहे.परीक्षार्थींनी प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. तसेच दोन वेळा पेपर फुटल्यामुळे सरकारने आमची सरसकट फेलोशिप मंजूर करावी, अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.