नागपूर: मुलगा अमोल याच्या विरोधातील मानसिक छळवणुकीची तक्रार काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणजित देशमुख यांनी मागे घेतली आहे. रणजित यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुखग यांनी मंगळवारी संध्यकाळी सदर माहिती माध्यमांना दिली.
ते म्हणाले की, आमचे घराणे राजकारणात असून येथे अनेक कळलावे लोक असतात जे घरामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करत असतात. या सगळ्यामागे अश्याच बाहेरील व्यक्तीचा हात आहे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. वडिलांनी माझ्याविरोधात तक्रार दिल्याची बातमी आल्यावर मी माझी पत्नी आणि आई सगळ्यांनाच धक्का बसला होता, असे अमोल यांनी सांगितले. परंतु आता सर्व ठीक असून घरातकी गोष्ट चार भिंतीतच राहावी, असे अमोल म्हणाले.
वडिलांसोबत संपत्तीवरून कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बहुतेक ते माझ्या वागणुकीने दुखावले गेले असतील पण आता सर्व ठीक आहे. माझे शिक्षण विदेशात झाले असून माझी पत्नी देखील उच्चशिक्षित आहे. आम्ही दोघांनी अनेक वर्षे विविध ठिकाणी काम केले. परंतु वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे समजताच आम्ही त्यांच्याजवळ राहायचा निर्णय घेतला, असे अमोल देशमुख यांनी स्पष्ट केले.
देशमुख परिवारारातील हा मालमत्ता वाद तसा जुना आहे. रणजित देशमुख ७२ वर्षांचे असून पार्किन्सन आजाराने ग्रस्त आहेत. मुलाच्या वागणुकीमुळेच मी आजारी पडल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले होते.