कामठी :कामठी तालुक्यातील गादा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे उपसरपंच अंकुश ठाकरे सह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात नुकताच प्रवेश केला.
गादा येथे सार्वजनिक मंच प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधेक्षतेत कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी मंचावर तंटामुक अध्यक्ष मनोहर भोयर, प्रभाकर डांगे, मधुकर ठाकरे, संतोष देवतळे, उत्तम जुनघरे, ग्रा प स देवराव भोयर,राजू देवतळे,निलकंठराव ठाकरे,तेजराम शेरकी, माजी उपसरपंच वसुंधरा खुरपडी, इत्यादी मान्यवरांची उपसस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन हेमंत देशमुख व प्रास्ताविक अशोक भोयर यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यात उपसरपंच अंकुश ठाकरे, ग्रा स सुधाकर बावनकर, संजय खुरपडी(पाटील),संजय मस्कर, मुकेश मेश्राम, सुरेश खुरपडी, रमेश खुरपडी, कृष्णा मोंडे,शालू खुरपडी, मीनाक्षी टाले, कविता खुरपडी इत्यादींनी पालकमंत्री हस्ते प्रवेश केला प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे बावनकुळे यांनी पक्षाचा दुपट्टा देऊन स्वागत केले
यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपण भाजपा पक्ष्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी तुमच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहील आदी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाच्या येशस्वीतेसाठी सचिन डांगे, खुशाल येवले,प्रमोद डागे, उमेश जुनघरे,अमोल ठाकरे, रामकृष्ण खुरपडी श्याम खुरपडी दिनेश डांगे, प्रवीण भोयर, जितेंद्र भोयर, निर्मला शेंडे,लक्ष्मी ठाकरे, पंकज शेंडे, इत्यादिस