नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा मुद्दा आज संसदेत विरोधकांनी उचलून धरला. याच मुद्द्यावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींना घेरले. या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल ८० दिवसांनी माध्यमांशी बोलताना फक्त ३० सेकंद भूमिका मांडली होती. यावर आता मोदींनी सभागृहात निवेदन करण्यावर विरोधक ठाम असून सत्ताधारी मंत्री भूमिका मांडण्यावर अडून बसले असताना विरोधकांनी मोदींच्या निवेदनासाठी थेट अविश्वास ठराव आणला आहे. या ठरावावर आज चर्चा होत असून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन प्रश्न करण्यात आले आहेत.
अविश्वास प्रस्तावावर काँग्रेस खासदार राहुल गांधी लोकसभेत बोलणार होते. मात्र ऐनवेळी काँग्रेस खासदार गौरव गोगोई अविश्वास ठरावावर बोलायला उभे राहिल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याचा विरोध केला. पण अध्यक्ष ओम बिर्लांनी गौरव गोगोईंना बोलण्याची परवानगी दिली. दरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चुप्पी साधून असल्याची टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.
विरोधकांनी मोदींना मणिपूरच्या मुद्द्यावरून तीन प्रश्न विचारले आहेत ते खालीलप्रमाणे :
१. आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का नाही गेले? राहुल गांधी गेले, इंडिया अलायन्सचे वेगवेगळे पक्ष गेले. गृहमंत्री गेले. गृहराज्यमंत्री गेले. पण देशाचे प्रमुख या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी का नाही गेले?
२. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूरवर बोलण्यासाठी जवळपास ८० दिवस का लागले? जेव्हा ते बोलले, तेव्हाही फक्त ३० सेकंद बोलले. त्यानंतर आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मणिपूरसाठी ना संवेदनशील भावना व्यक्त झाल्या ना शांतीचे आवाहन झाले.
३. पंतप्रधानांनी आजपर्यंत मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून का नाही काढले ? तुम्हाला गुजरातमध्ये तुमचं राजकारण करायचे होते तेव्हा तिथे एकदा नाही, दोनदा मुख्यमंत्री बदलले. उत्तराखंडमध्ये निवडणुका आल्या तेव्हा एदा नव्हे चार वेळा मुख्यमंत्री बदलले. त्रिपुरातही निवडणुकांआधी तुम्ही मुख्यमंत्री बदलले. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही का एवढे आशीर्वाद देत आहात ज्यांनी स्वत: हे मान्य केले आहे की त्यांच्यामुळे इंटेलिजन्स फेल्युअर झाले