Published On : Fri, Dec 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

काँग्रेसने भाजपला घाम फोडला;पाच राज्यांतील निवडणुकीच्या एग्झिट पोलवर संजय राऊतांचे विधान

Advertisement

नागपूर : मध्य प्रदेशसह राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. या निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. तत्पूर्वी एग्झिट पोलचे निकाल समोर आले आहे. यामध्ये काही राज्यांत काँग्रेसचा दबदबा पाहायला मिळत आहे. तर काही राज्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत आहे. या घडामोडीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

भाजपाने २०१४ पासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली होती. पण त्याच काँग्रेसने आणि काँग्रेसच्या राहुल गांधीसह प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा करणाऱ्यांना घाम फोडला. पंतप्रधान मोदींना आठ-आठ दिवस एका राज्यात राहावे लागत आहे. गृहमंत्र्यांना संपूर्ण देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरावे लागत आहे.

Today’s Rate
Thursday 07 Nov. 2024
Gold 24 KT 77,000 /-
Gold 22 KT 71,600 /-
Silver / Kg 91,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हे ‘काँग्रेसमुक्त भारत’चं लक्षण नसून २०२४ ला तुमच्यापासून भारताला मुक्ती मिळणार आहे, याची ही हवा आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की, राजस्थानसह चारही राज्यात काँग्रेस पक्षाचं म्हणजेच इंडिया आघाडीचं सरकार बनेल आणि मिझोराममध्येही प्रादेशिक पक्षांबरोबर काँग्रेस सत्तेत असेल, असा दावा राऊतांनी केला आहे. यावर भाजपचे काय प्रत्युत्तर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement