Advertisement
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आज नागपूर दौऱ्यावर आहेत. पक्षाचे नवनिर्वाचित आमदार, विधान परिषदेचे सदस्य आणि विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या सर्व उमेदवारांची ते महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
नागपुरातील काँग्रेस पक्ष कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत विधानसभेतील काँग्रेस गटनेतेपदाचाही निर्णय होणार आहे. याशिवाय पक्षाची सध्याची धोरणे, भविष्यातील योजना, संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा होणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊनही या बैठकीत चर्चा होणार आहे. आगामी निवडणुकीची तयारी आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दिशेने ही बैठक महाराष्ट्र काँग्रेससाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.